नुकसान भरपाई ; या शेतकऱ्यांना मिळणार 40 हजार रुपयापर्यंत भरपाई.

नुकसान भरपाई ; या शेतकऱ्यांना मिळणार 40 हजार रुपयापर्यंत भरपाई.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले. या नुकसानीचे पंचनामेही अंतिम टप्पात आहेत. मात्र आता सरकार शेतकऱ्यांना नव्या निकषानुसार भरपाई देणार का? जुन्या असा प्रश्न शेतकऱ्यांना पडणार आहे.

सरकार जोपर्यंत नव्या निकषानुसार भरपाई जाहीर करत नाही तोपर्यंत जुन्या निकषानुसार म्हणजेच, कमी दराने नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारला नव्या निकषानुसार म्हणजेच वाढीव दराने भरपाई देण्याची मागणी केल्यानंतर वाढीव दराने भरपाई मिळू शकते. अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

राज्य सरकारने नोव्हेंबर 2023 पासून अवकाळी पाऊस, गारपीट, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यासाठी राज्य सरकारने 01/जानेवारी/2024 रोजी अधिकृत शासन निर्णय जिआर काढला होता. सदर योजनेच्या जिआर मध्ये नमूद केले होते की, नोव्हेंबर 2023 पासून आणि त्यानंतर गारपीट, अवकाळी पाऊस, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास वाढीव भरपाई दिली जाईल. म्हणजेच NDRF च्या मदतीपेक्षा अधिक भरपाई राज्य सरकारने जाहीर केली होती.

सदर योजनेच्या अधिकृत जिआर मध्ये नमूद केले होते की, कोरडवाहू पिकांसाठी नव्या निकषानुसार हेक्टरी 8,500 रुपयांवरून 13,600 रुपये करण्यासाठी नमूद केले आहे. बागायती 17,000 रु ऐवजी 27,000 रुपये, तर फळ पिकांसाठी 22,500 ऐवजी 36,000 रुपये नव्या निकषानुसार GR मध्ये नमूद स्पष्ट होते.

🔵 सरकारने नुकसान भरपाईसाठी क्षेत्र मर्यादाही वाढली..?

नोव्हेंबर 2023 जुन्या निकषानुसार 02 हेक्टर पर्यंत भरपाई मिळत होती. मात्र आता सरकारने भरपाईची मर्यादा 02 हेक्टरवरून 03 हेक्टर एवढी केली आहे. म्हणजेच एका शेतकऱ्यांला जास्तीत जास्त 03 तीन हेक्टरपर्यंत भरपाई मिळेल असे सरकारने 01/जानेवारी/2024 रोजी स्पष्ट केले होते. आता कोरडवाहू शेतकऱ्यांना 03 हेक्टरच्या मर्यादेत म्हणजेच 40 हजार रुपये मिळतील. पण त्याआधी सरकारला निर्णय घ्यावा लागेल.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com