ई पीक पाहणी केली पण तुमची पीक पाहणी यशस्वी झाली का? असं चेक करा.

ई पीक पाहणी केली पण तुमची पीक पाहणी यशस्वी झाली का? असं चेक करा.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतजमीनाच्या पिकांची नोंद 7/12 उताऱ्यावर करणे यालाच ई-पिक पाहणी असे म्हणतात. शासनाच्या नवीन नियमानुसार, ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील पिकांची ई-पिक पाहणी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांची जमीन पडीत गृहीत धरली जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फात कोणतेही अनुदान मिळणार नाही जसे की, पिक विमा, नुकसान भरपाई इत्यादी, शासनाचे अनुदान त्या शेतकऱ्यांला मिळणार नाही. तरीही ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील असलेल्या पिकांची ई-पिक पाहणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात- लवकर ई-पिक पाहणी पूर्ण करावी…

 

शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या शेतातील शेतमालांची ई-पिक पाहणी पूर्ण केलेली आहे आणि तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे की, आपल्या पिकांची ई-पिक पाहणी यशस्वी झालेली आहे का? हे कसे बघायचे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. पिक विमा नुकसान भरपाई हा 7/12 ला ई-पिक पाहणीची नोंद असल्याशिवाय मिळणार नसल्याने, आपण केलेली ई-पिक पाहणी यशस्वी झालेली आहे का हे प्रत्येक शेतकऱ्यांनी चेक करायला पाहिजे. राज्यात सध्या कांदा अनुदान हे दिले जात आहे त्यासाठी सुरुवातीला शासनाच्या मार्फत ई-पिक पाहणीची अट घालण्यात आली होती.

आपल्या शेतातील शेतमालाची ई-पिक पाहणी यशस्वी झाली का? कशी चेक करायची….

1) सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये ई-पिक पाहणीची एप्लीकेशन डाउनलोड करा.

2) त्यानंतर गावाचे खातेदाराची ई-पिक पाहणी या पर्यायावर क्लिक करा.

3) त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी दिसेल.

4) या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी यशस्वी झालेली आहे त्या शेतकऱ्यांचे नाव हिरव्या कलर मध्ये दाखवले जाईल.

5) ज्या शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी यशस्वी झालेली नाही त्या शेतकऱ्यांचे नाव हिरव्या कलर मध्ये दाखवले जाणार नाही.

शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ई-पिक पाहणी केली असेल तर तुमचे नाव हिरव्या कलर मंध्ये दाखवले जाईल, जर तुम्ही ई-पिक पाहणी केली आहे आणि तरीसुद्धा तुमचे नाव हिरव्या कलर मंध्ये दाखवत नसेल तर तुमची ई-पिक पाहणी यशस्वी झालेली नाही असे समजावे. तुम्ही जर नुकतीच ई-पिक पाहणी केली असेल तर तुमचे नाव उपडेट होण्यासाठी थोडा वेळ लागेल.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com