ऑगस्ट सप्टेंबर नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 13,600 रुपये.

ऑगस्ट सप्टेंबर नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 13,600 रुपये.

यंदा ला निनो सक्रिय झाल्यामुळे राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. तर अजून ही काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे. यावर्षी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालं आहे. त्यांना मदत करण्यासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच्या जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी सरकार पूर्वी 8500 रुपये देत होते. मात्र आता या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता इथून पुढे शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये हेक्टरी सरकारी अनुदान मिळणार आहे..

राज्य सरकारने ही माहिती ट्विटरवर पोस्ट करत दिली आहे. या पावसात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना सरकार मदत करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याच्या उद्देशाने दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच्या शेतकऱ्यांना उद्देशाने 13,600 रुपये प्रति हेक्टर देण्यात येणार आहे.

राज्यात अनेक भागात पावसाळ्यात भात पिकांचे उत्पन्न घेतले जातात. मात्र भात पिकाची लागवड करून काहीच दिवसानंतर जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com