केंद्र सरकारकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा – या दराने खरेदीच्या सुचना
राज्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तर त्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पुढील 90 दिवसात 1.3 लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील पणन विभागाला सोमवारी अधिकृत पत्र प्राप्त होणार असून `नाफेड´ आणि `एससीसीएफ´ चा खरेदी केंद्र व सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे.
या योजनेमध्ये उडीद देखील खरेदी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 4892 रुपये प्रति क्विंटल निश्चित केले आहे. या दराने सोयाबीन खरेदी केली जाईल. सध्या राज्यांमध्ये सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. मागील वर्षाची तफावत भरून काढण्यासाठी हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
नुकसान भरपाई ; या शेतकऱ्यांना मिळणार 40 हजार रुपयांपर्यंत मदत
धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी कार्यालयाला पत्र पाठवून `नाफेड´ आणि `एससीसीएफ´ मार्फत हमीभावावर सोयाबीन खरेदी करावी, अशी धनंजय मुंडे यांनी मागणी केली होती. केंद्रीय कृषी विभागांनी सोशल मीडियावर महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यातील सोयाबीन खरेदीची माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून या तिन्ही राज्यात किमान हमीभाव योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली असून या योजने अंतर्गत `नाफेड´ आणि `एससीसीएफ´ यासारख्या नोडल एजन्सीमार्फत तसेच राजकीय संस्थामार्फत शेतकऱ्यांच्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी केली जाईल. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार असल्याची माहिती देण्यात आली.
हेही वाचा – फवारणी पंप लॉटरी यादी आली जिल्हानिहाय येथे क्लिक करून यादी डाऊनलोड करा
ही योजना पुढील 90 दिवस सुरू राहणार आहे. या योजनेमार्फत सोयाबीन सोबत उडीद सुद्धा खरेदी करण्यात येणार आहे. राज्य कृषी महोत्सवनिमित्त केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान परळीत असताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन खरेदीची मागणी केली होती आणि दिल्लीतही बैठक घेऊन पाठ पुरवठा केला होता. तसेच राज्यकीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व बाजारभावात घसरण झाल्याने त्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात मान्यता देण्यात आली आहे.
फवारणी पंप लॉटरी यादीत तुमचे नाव आहे का चेक करा PDF डाउनलोड.