पंजाबराव डख लाईव्ह – पावसाचा जोर कमी होईल पण या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी काल दिनांक. 04/सप्टेंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला असून, काल दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर ओसरला आहे. तसेच सूर्यदर्शन झाले आहे. आज आणि उद्या पंजाबराव डख यांनी बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला असून कडक सूर्यदर्शन झाले आहे. याशिवाय संपूर्ण राज्यात 11/सप्टेंबरपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नाही. 01/सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी पंजाबराव डख यांनी केली आहे.
🔸आजचा हवामान अंदाज काय..?
पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 04,05, सप्टेंबर रोजी लातूर, बीड, परभणी, सोलापूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, आणि गोंदिया या जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर असेल असं पंजाबराव डख यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी खालील YouTube video पहा.