पंजाब डख लाईव्ह : पुढील 10 दिवस पावसाची विश्रांती, या भागात तुरळ ठिकाणी पाऊस.
राज्यातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी काल दिनांक. 11/सप्टेंबर रोजी नवीन हवामान अंदाज भाकीत केला आहे. पंजाबराव डख यांच्या नवीन अंदाजानुसार आज पासून पुढील 07 दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे. आणि सर्व दूर सूर्यदर्शन होणार आहे.
पंजाबराव डख यांनी हा अंदाज धाराशिव जिल्ह्यातुन वर्तवला असून, तरी त्यांनी धाराशिव व इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 12/ सप्टेंबर ते 19/सप्टेंबर पर्यंत सोयाबीनची काढणी करून घ्यावी असं आवाहन केले आहे. तसेच राज्यात 13/सप्टेंबर पासून ते 19/सप्टेंबर पर्यंत पावसाची उघाड राहणार आहे.
राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आलं आहे अशा शेतकऱ्यांनी ह्या 8 ते 10 दिवसात सोयाबीन काढून घ्यावं. हवामान बगुन काढलेलं सोयाबीन ला उन देऊन व्यवस्थित झाकून ठेवावं. राज्यात परत 20/सप्टेंबर पासून पुन्हा राज्यात पाऊस सुरु होणार आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्र, धाराशिव, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, जालना, परभणी, या जिल्ह्यात उद्या दुपारनंतर 20/सप्टेंबर पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे.
🔵आज या भागात पावसाचा अंदाज पंजाब डख.
आज 11/सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भ, आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भात 14, सप्टेंबर पासून चांगले सूर्यदर्शन होणार आहे. सरकारी योजना, शेती विषय माहिती, हवामान अंदाज, पाहण्यासाठी आत्ताच आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा…अधिक माहितीसाठी खालील YouTube video पहा.