पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता तुम्हाला मिळणार का? कसं चेक करावं.
पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 18/वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांना कधी मिळणार याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील वाशीम येथील एका कार्यक्रम दरम्यान 05/ऑक्टोंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18/व्या हप्त्याचे वितरण देशभरातील पात्र शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे.
पिएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे बॅक खाते आधारशी लिंक करणे व केवायसी करणे आवश्यक असणार आहे. ज्या लाभार्थ्यांची ई_केवायसी तसेच बॅक अकाउंटला आधार लिंक नसेल त्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. तुमची ई-केवायसी तसेच बॅक खात्याशी आधार लिंक नसल्यास, ते लवकर करा जेणेकरून तुम्हाला पिएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पात्र ठरू शकतील.
सदर योजनेंत ई-केवायसी आणि खात्याशी आधार लिंक नसल्यामुळे, पूर्वीचे काही हप्ते मिळाले नसतील तर आता ई-केवायसी आणि बॅक खाते आधारशी जोडल्यास, या 18 व्या हप्त्याबरोबर मागील थकबाकीचे हप्ते जमा होतील. म्हणजे 18/व्या हप्त्यासोबत काही लाभार्थ्यांना 4000 तर काही लाभार्थ्यांना 6000 रुपये मिळतील.
🟢तुमची ई-केवायसी पूर्ण झाले आहे का?
ते कसे चेक कराचे, ई-केवायसी पूर्ण नसेल तर शक्य तितक्या लवकर ई-केवायसी पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला पिएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पात्र राहता येईल.