रामचंद्र साबळे हवामान अंदाज – या आठवड्याचे हवामान आणि परतीच्या पावसाचा अंदाज.
हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी आज नवीन हवामान अंदाज प्रकट केला असून, राज्यात आज आणि उद्या म्हणजेच 08,09/सप्टेंबर रोजी राज्यातील हवेचा दाब 1006 हेक्टापास्कल एवढा राहील. त्यामुळे मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे. 11/ते/13/सप्टेंबरपर्यंत 1004 ते 1006 हेक्टापास्कल हवेचा दाब राहील. 10/ ते 13/सप्टेंबर त्या वेळी मध्यम स्वरूपातील पावसाचे प्रमाण अधिक राहील.
रामचंद्र साबळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणात मध्यम स्वरूपात, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि धुळे हलक्या, जळगाव आणि नंदुरबारमध्ये मध्यम स्वरूपातील पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील धाराशिव, बीड, हलक्या, तर जालना छत्रपती संभाजीनगर, जिल्ह्यात मध्यम स्वरूपात, पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ आणि पूर्व विदर्भात चालू आठवड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज साबळे यांनी दिला आहे.
राज्यात परतीचा पाऊस सुरु होईला वेळ लागेल, कारण दिनांक.13/सप्टेंबरपर्यंत राजस्थानमधील तापमान कमी राहिल्यामुळे हवेचा दाब 1000 हेप्टापास्कल इतके कमी राहील. त्यामुळे राज्यात पाऊस सुरूच राहील. जोपर्यंत राजस्थानमध्ये पाऊस थांबणार नाही व हवेच्या दाबात वाढ होत नाही तोपर्यंत ईशान्य मान्सून सुरु होणार नसल्याची माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.