हरभरा खत व्यवस्थापन ; एकरी 18/क्विंटल उत्पादन संपूर्ण माहिती.
शेतकरी मित्रांनो आपण या लेखा मध्ये हरभरा पिकाच्या खत व्यवस्थापनाची माहिती जाणून घेणार आहोत. भरपूर शेतकऱ्यांना हरभरा पिकाला पेरणी बरोबर कोणते खत द्यावीत हे ठाऊक नसते.
सध्या सर्वच भागात सोयाबीनची काढणी सुरु आहे. तर काही भागात सोयाबीन काढून शेतकरी हरभरा पेरणीची घाई गरबड करत आहेत.
हरभऱ्याला खत व्यवस्थापन कोणतं करायचं, हरभरा पिकाचे खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला तीन प्रकारामध्ये व्यवस्थापन करायचे आहे. पहिलं म्हणजे मध्यम जमिनीसाठी, दुसरं भारी जमीन, तिसरं हलक्या जमीन या तीन जमिनीमध्ये खताचे व्यवस्थापन कसं करायचं ते आपण या लेखा मध्ये पाहूया.
1) सर्व प्रथम हलक्या जमीनीसाठी
(20:20:0:13) किंवा 24:24:08 या दोन खता पैकी आपण एकरी एक ते दोन बॅग पेरू शकतो.
2) मध्यम जमिनीसाठी आपण DAP किंवा 12:32:16 किंवा 14:35:14 पेरू शकतो.
3) भारी जमिनीसाठी आपण (सिंगल सुपर फोसफेट) एकरी दोन बॅग याबरोबर 20 ते 25 किलो पोटॅश पेरलं तर आपल्याला जबरदस्त उत्पादन मिळेल.
आपला हरभरा मर होत असल्यास मरी साठी आपल्याला खत पेरायचे असेल तर आपण या खतांनबरोबर धर्ती कंपनीचे (बायो टोप) एकरी 4 किलो पेरल्यामुळे जमिनी मधली बुरशी नष्ट होईल. आणि मर रोगावर नियंत्रण मिळेल आणि उत्पादनामध्ये वाढ होईल.
माहिती योग्य वाटल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा..