प्रधानमंत्री मानधन योजना – या शेतकऱ्यांना दर महिन्याला 3000 रुपये मिळणार.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना तीन टप्प्यात 6000 रुपये देण्यात येतात. आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 17 हप्ते वितरित झाले आहे. म्हणजेच 34 हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने पीएम किसान योजनेप्रमाणेच प्रधानमंत्री किसान मानधन योजनाही शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना आणली आहे. Pm किसान मानधन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. नेमकी ही योजना काय आहे. आणि या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत. याची संपूर्ण माहिती या लेखात पाहुया.
🔸PM किसान मानधन योजना म्हणजे नक्की काय?
PM किसान मानधन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या वयाच्या 60 वर्षांनंतर मासिक 3000 रुपये पेन्शन दिली जाते. ही योजना ऐच्छिक असून, शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये जमा करावे लागतील. आणि वयाचे 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळेल.
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी शेतकऱ्यांना केंद्र किंवा राज्य नोडल अधिकारी यांच्याकडून मोफत नोंदणी करता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये प्रीमियम भरावा लागेल. या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्याकडे 02 हेक्टरपेक्षा कमी जमीन असावी. शासनाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत या योजनेमध्ये 20 लाखाहुन अधिक शेतकऱ्यांना नोंदणी केली आहे.