Panjab-dakh-havaman-andaz – पाऊस कधी उघडणार सोयाबीन उत्पादकांना महत्वाचा सल्ला

Panjab-dakh-havaman-andaz – पाऊस कधी उघडणार सोयाबीन उत्पादकांना महत्वाचा सल्ला

Panjab-dakh-havaman-andaz – राज्यातील हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवीन अंदाज वर्तवला असून, या अंदाजामध्ये त्यांनी 13/ सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाचा अंदाज दिला आहे. 13/सप्टेंबर नंतर पाऊस विश्रांती घेणार असून. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी आहे. पावसाने विश्रांती घेतल्यास शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी सुरू करावी असे पंजाबराव डख यांनी सांगितले.

पंजाबराव डख यांच्या मते, 13/सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, नांदेड, भंडारा, गोंदिया, वाशीम, हिंगोली, परभणी, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, आणि अमरावती या जिल्ह्यात पावसाचा जोर असेल. उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होऊन अधून मधून एखादा पाऊस होऊ शकतो. Panjab-dakh-havaman-andaz

🔵राज्यात या तारखेपासून पुन्हा पावसाला सुरवात होणार.

पंजाबराव डख यांनी काल दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यात दिनांक. 22/सप्टेंबर पासून पुन्हा पावसाला सुरवात होईल. ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढणीस आल्या आहे त्यांनी वातावरण बगुन सोयाबीनची काढणी करावी.

राज्यात 13/ सप्टेंबर पासून सर्व दूर हवामान स्वच्छ होईल. तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 13/सप्टेंबर ते 22/सप्टेंबर पर्यंत उडीद, सोयाबीन, मुगाची काढणी करावी. तसेच काढलेली सोयाबीन हवामान बगुन व्यवस्थित झाकून ठेवावी.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com