लाडकी बहीण योजना या दिवशी येणार 1500 रुपये खात्यात अधिक माहिती येथे पहा.

लाडकी बहीण योजना या दिवशी येणार 1500 रुपये खात्यात अधिक माहिती येथे पहा

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या बरेचसे बदल करणे सुरू आहेत. लाडकी बहिणी योजनेत अर्ज करण्याची मुदत ही वाढवण्यात आलेली आहे, आता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30/सप्टेंबर असणार आहे.

 

आता सप्टेंबर मध्ये ज्या महिला अर्ज करणार आहेत त्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडूनच अर्ज मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. आता बाकी लोकांना अर्ज मंजूर करण्याची परवानगी नाही. या सोबतच 1500 रुपये नेमके महिलांच्या खात्यात कधी जमा होणार? कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार? याबाबत देखील मोठी अपडेट समोर आलेले आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झालेली आहे. जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यावर बऱ्याच महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांना 31/जुलै पर्यंत आपले अर्ज भरता आले नाहीत. ज्या महिलांनी 31/जुलै पर्यंत अर्ज केले नाही त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नव्हते.

 

ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले आहे आणि त्या महिलांचे अर्ज मंजूर देखील झालेले आहे त्या महिलांचे पैसे आता सप्टेंबर महिन्यात जमा केले जाईल. आशा महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या तीनही महिन्याचे एकत्र पैसे 4500 रुपये जमा करण्यात येण्याची माहिती समोर येते. कारण या महिलांना जुलै महिन्यामध्ये लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला नव्हता त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित पैसे येण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 19/सप्टेंबर पर्यंत येण्याची शक्यता आहे. सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येईल याची अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र 19/सप्टेंबर पर्यंत हे पैसे जमा होण्याचा अंदाज आहे.

 

दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरवात केली आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले आहे. तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे. त्यामुळे महिलांनी आपले खाते तपासावे, कदाचित तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा देखील झाले असतील.

 

🟢या महिन्यात फक्त 1500 मिळणार?

ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करणार आहेत, तर अशा महिलांना सप्टेंबर पासून लाभ मिळणार आहे. त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा केले जाणार नाहीत. जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्याय मधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com