बँक खात्याला आधार लिंक कसे करावे, लाडकी बहीण योजना तरच खात्यात पैसे जमा होणार.

बँक खात्याला आधार लिंक कसे करावे, लाडकी बहीण योजना तरच खात्यात पैसे जमा होणार.

 

राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास झाली असून, मात्र लाखो महिलांचे पैसे अर्ज मंजूर असूनही जमा झालेले नाही. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या महिलांपैकी 27/लाखाहुन अधिक महिलांचे बँक खात्याला आधार लिंक नसल्याची माहितीसमोर आली आहे.

 

ज्या महिलांचे आधार लिंक नसल्याने लाडकी बहीण योजनेचे दोन हप्त्याचे मिळून 3,000 रुपये मिळाले नाहीत. ज्या महिलांचे बँकेला आधार लिंक नाही त्या महिलांना बँकेला आधार लिंक केल्यानंतर या दोन हप्त्याचा लाभ मिळेल. असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

 

ज्या महिलांचे बँकेला आधार लिंक नाही त्या महिलांनी लवकर बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे. किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडा, पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाते ओपन केल्यानंतर दोन दिवसात तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होईल.

 

🔸 बँक खात्याला आधार लिंक कसे करावे..?

सर्वप्रथम तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक शाखेत जाऊन आधार लिंकचा एक फॉर्म भरून त्यासोबत आधार कार्ड झेरॉक्स, आणि खातेधारकांचा पासपोर्ट फोटो द्यावा लागेल. ही सर्व प्रोसेस केल्यानंतर बँकेच्या नियमानुसार व कालावधीनुसार तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होईल.

 

लाखो महिलांचे बँकेला आधार लिंक नसल्याने लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा न झाल्याने सध्या बँकेत महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे आधार लिंक होण्यासाठी कमीत कमी आठवडाभराचा कालावधी लागू शकतो.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com