परतीचा पाऊस कधी सुरु होणार निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे.

परतीचा पाऊस कधी सुरु होणार निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे.

 

मानीकराव खुळे यांनी सांगितले की सप्टेंबर मध्ये सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज..माणिकराव खुळे हे ज्येष्ठ हवामान तज्ञ त्यांनी सप्टेंबर मध्ये पावसाचा अंदाज कसा राहील याबाबत त्यांनी त्यांचे अंदाज व्यक्त केले आहे. आता सध्या सप्टेंबर मध्ये खरीप पिकाची काढणी सुरू होईल त्या दरम्यान शेतकऱ्यांना पावसाचा उघड असण्याची गरज आहे. सप्टेंबर महिन्यात जर पाऊस सारखा लागून राहिला तर खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. तसेच ला-नीना स्थिती कशी असेल याबाबत विस्तृत माहिती माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.

माणिकराव खुळे सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा अंदाज कसा राहील ते सांगतात की, परभणी, लातूर, धाराशिव, हिंगोली, नगर, सोलापूर या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी तर उंचीच्या महाराष्ट्रात सरासरी पेक्षा अधिक म्हणजे 109% पावसाची शक्यता आहे. एकंदरीत राज्यात सप्टेंबर महिन्यामध्ये 96% ते 104% पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अनेक जिल्ह्यात किंवा अनेक ठिकाणी खरिपातील पिकांची काढणी करण्यास अडचणी येऊ शकते.

 

🔵सप्टेंबर मध्ये या जिल्ह्यात सर्वाधिक…

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई सह संपूर्ण कोकण महाराष्ट्रात अति जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज माणिकराव खुळे यांनी दिलेला आहे. कोकण-मध्य महाराष्ट्र, उत्तर-मध्य महाराष्ट्र, या ठिकाणी दिनांक 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रामध्ये 16 ते 30 सप्टेंबर या दोन आठवड्यातील पाऊस ला-नीना च्या विकासावर अवलंबून असेल. तरी एकंदरीत सप्टेंबर मध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस होईल असे देखील माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

 

🔵परतीचा पाऊस कधी सुरू होईल माणिकराव खुळे म्हणतात की…

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 सप्टेंबर पासून परत परतीचा पाऊस फिरण्यास सुरुवात होते. त्यानंतर 19 दिवसात महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत येतो आणि पुढे पाच दिवसात महाराष्ट्रातून निघून जातो. हवामान खात्याने जाहीर केल्यानंतर परतीच्या पावसाबाबत सविस्तर अंदाज दिला जाईल असे माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com