Retreating Monsoon update : परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज
Retreating Monsoon update – नैॡत्य मोसमी वऱ्यांचा प्रवास शेवटच्या टप्प्यात आला असून. येत्या 02 दिवसांत मोसमी वारे वायव्य भारताच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. तसेच हवामान विभागाने मॉन्सून परतीच्या काळात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालण्याची शक्यता ही हवामान खात्याने दिली. या पावसामध्ये वादळी वारे, विजांसंह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघड दिल्याने उन्हाचा पारा वाढला आहे. तसेच पोषक हवामान झाल्याने वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली आहे. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन आठवडे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, 10/ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे.
Retreating Monsoon update येत्या 02 आठवड्यांत धाराशिव, सोलापूर, सांगली, जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक तर बीड, लातूर, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्यांच्या बहुतांश भागांत सरासरी पेक्षा जास्त पावसाची शक्यता असून, 27/सप्टेंबर पासून ते 03/ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली. तसेच दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात 03/ ऑक्टोंबर ते 10/ऑक्टोंबर पर्यंत सर्वदूर पावसाचा अंदाज आहे.
🟢नवरात्रोत्सवात पावसाचा जोर वाढणार का?
मॉन्सूनचा परतीचा प्रवास या वर्षी ही लांबला आहे. देशाच्या प्रमुख भागांमधून मॉन्सूनची माघार उशिरा होण्याची शक्यता असून, सध्या उत्तर-पश्चिम भारतात थोडी कमी पावसाची स्थिती असल्याने पश्चिम राजस्थानमध्ये आणि कच्छ भागातून दक्षिण-पश्चिम मॉन्सूनची माघार 23/सप्टेंबरपर्यंत सुरू होऊ शकते. परंतु हवामान विभागाच्या विस्तारित अंदाजानुसार 23/सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या प्रणालीच्या निर्माणामुळे मध्य भारतात आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड व महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने दिला. Retreating Monsoon update