Pm kisan 18’th instalment news :- तुम्हाला २००० रुपयांचा हप्ता मिळाला नाही काय करावे पहा.

Pm kisan 18’th instalment news :- तुम्हाला २००० रुपयांचा हप्ता मिळाला नाही काय करावे पहा.

 

Pm kisan 18’th instalment news :- काल दि. ०५/ऑक्टोबर/ २०२४/रोजी १०:०० वाजता वाशीम मधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM किसान योजनेचा १८/वा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. PM किसान योजनेचा हप्ता (DBT) द्वारे वितरित करण्यात आला आहे. हे पैसे आज आणि उद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

सदर योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांच्या बॅक खात्याला आधार लिंक व ई-केवायसी पुर्ण असणे आवश्यक आहे. PM किसानचा हप्ता सकाळी १०:०० वाजता (DBT) द्वारे टाकले असुन, हे पैसे संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी किमान २४/तासांचा आवधी लागेल असे सांगितले आहे. तुम्हाला हे पैसे जमा झाले नसतील तर काय करावे..?

सरकारी अनुदान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ते पिकविमा तसेच PM किसान योजनेचा हप्ता आता आधार लिंक असलेल्या खात्यात जमा केला जात आहे. तुमच्या आधार कार्ड शी कोणती बॅंक लिंक आहे ते चेक करा. आज आणि उद्यापर्यंत PM किसान योजनेचा हप्ता जमा होईल यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या बॅकेत पैसे जमा झाले का? चेक करा.

PM किसान योजनेचा हप्ता आज किंवा उद्या सुद्धा जमा झाला नाही तर खालील प्रमाणे तुम्ही तुमच्या हप्त्याबाबत विचारणा करु शकता.

तुमची (ई-केवायसी) आणि आधार लिंक पुर्ण असेल आणि तरीही तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल, तर तुम्ही pmkisan-ict@gov.in वर मेल पाठवून मदत मागू शकता. तसेच तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधू शकता – 155261 आणि 1800115526, 011-23381092. येथे संपर्क केल्या वर तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल आणि योजनेचे अडकलेले पैसे कसे मिळवायचे ते सांगितले जाईल.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com