कापूस सोयाबीन अनुदान : तुमचे अनुदान मिळाले का असं चेक करा.

कापूस सोयाबीन अनुदान : तुमचे अनुदान मिळाले का असं चेक करा.

 

गेल्या हंगामात पडलेल्या बाजारभावामुळे आणि दुष्काळामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्या आधी भावांतर योजनेची घोषणा केली आणि नंतर दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी 05 हजार रुपये देण्याचे जाहीर केले. ह्या अनुदान वितरण प्रणाली साठी एक स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. तसेच शेतकऱ्यांना आधार संबंधित डाटा वापरण्याचे सहमती पत्र व अर्ज भरून घेतले आहेत.

कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे ई-केवायसी केल्यानंतर कापूस आणि सोयाबीन अनुदान (हेक्टरी 5000 रूपये) (DBT) द्वारे आधार लिंक बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे.

🔵कापूस सोयाबीन अनुदान तुम्हाला मिळाले का? हे कसे चेक करावे.

कापूस सोयाबीन अनुदान मिळाले का? हे ऑनलाईन चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://scagridbt.mahait.org/FarmerLogin/Login या पोर्टलवर लॉगिन करावं लागेल. त्यानंतर डिबर्समेंट स्टेट्स या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाकून OTP च्या माध्यमातून लॉगिन करा. OTP टाकल्यावर शेतकऱ्याची सर्व माहिती मोबाईल वर दिसेल. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, किती क्षेत्रासाठी अनुदान मंजूर झाले आहे, अनुदानाची रक्कम कोणत्या बँक खात्यात जमा झाली हि संपूर्ण माहिती मिळेल.

कापूस सोयाबीन अनुदान मिळाले का चेक करा ऑनलाईन मोबाईलवर

कापूस सोयाबीन अनुदानाचा 100% निधी वितरणास आचारसंहितेपुर्वी मंजुरी मिळाल्याने जसजसे शेतकरी अनुदानासाठी पात्र होतील तसतसे शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यात अनुदान जमा होईल.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com