i pik pahani kharif 2024 – ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्याकडे फक्त एवढेच दिवस बाकी..शेवटची तारीख कोणती आहे ती पहा.?

i pik pahani kharif 2024 – ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्याकडे फक्त एवढेच दिवस बाकी..शेवटची तारीख कोणती आहे ती पहा.

i pik pahani kharif 2024- शेतकरी मित्रानो आपल्या पिकाची 7/12 वर नोंद करणे हे शासनाच्या नवीन नियमानुसार अनिवार्य आहे. शेतकरी मित्रानो आपल्या शेताची जर ई-पीक पाहणी झालेली नसेल, तर शासनाच्या मार्फत आपली जमीन पडीत गृहीत धरली जाते. आणि आपल्याला कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही, जसे की पिक विमा, नुकसान भरपाई यासारख्या योजनेतून आपल्याला बात करण्यात येते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.

ई-पीक पाहणी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अप्लिकेशन निर्माण करण्यात आलेली आहे. ती एप्लीकेशन डाउनलोड करा आणि ई-पीक पाहणी लवकरात-लवकर करून घ्या. ई-पीक पाहणी केली नाही तर पुढे चालून तुम्हाला या अडचणी येऊ शकतात…?i pik pahani kharif 2024

1) नुकसान भरपाई आणि पिकविमा यासारख्या शासकीय योजना मिळण्यासाठी अडचणी येतील.

2) सोसायटी किंवा बँकेकडून पीक कर्ज मिळण्यासाठी अडचणी येतील.

3) शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या अनुदानासाठी ई-पीक पाहणीचा आधार घेतला जातो, त्यामुळे पुढे चालून अशा अनुदानासाठी अडचणी येऊ शकतात….

4) गारपीट नुकसान भरपाई मिळण्यासाठी अडचणी येतील.

यंदा खरीप पिकांची ई पीक पाहणी करण्यासाठी 15/09/2024 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे अजूनही ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली नाही त्या शेतकरी लवकरात-लवकर ई-पीक पाहणी करून घ्यावी. तुम्ही जर 15 सप्टेंबर पर्यंत जर ई-पीक पाहणी केली नाही तर तुमची जमीन पडीत गृहीत धरली जाईल, आणि तुम्हाला वरील अडचणी येऊ शकतात.i pik pahani kharif 2024

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com