अतिवृष्टी नुकसान भरपाई या 26 जिल्ह्यात मिळणार तुमचा जिल्ह्या आहे का चेक करा.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई या 26 जिल्ह्यात मिळणार तुमचा जिल्ह्या आहे का चेक करा

राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, पूर परिस्थिती, दुष्काळ, चक्रीवादळ, या सारख्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पुढील हंगामात उपयोगी पडावे यासाठी निविष्ठा अनुदान दिले जाते. हे निविष्ठा अनुदान राज्य आपत्तीमधून एका वर्षात एकदा दिले जातात.

01/जानेवारी/2024 च्या अधिकृत शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मध्ये अवेळी गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीने आणि त्यापुढील कालावधीसाठी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना 02 हेक्टर ऐवजी 03 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला आहे.

दिनांक 05/सप्टेंबर/2024 च्या शासन निर्णयानुसार (नोव्हेंबर 2023) मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत विभागीय आयुक्तांनी मदतीसाठी शासनाला प्रस्ताव पाठवले होते. त्या प्रस्तावा बाबत शासनाने 05/सप्टेंबर/2024 रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करून बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.

नुकसान भरपाई बाबत शासन निर्णय पहा..?

राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, अवेळी पाऊस, गारपीटीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारने सुधारित दरानुसार 307.2529 कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. दिनांक. 05/सप्टेंबर/2024 च्या शासन निर्णयानुसार आहे.

राज्य सरकारने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना 307 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये 26, जिल्हे पात्र असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी नुकसान ग्रस्त क्षेत्रानुसार निधी मंजूर केला आहे. तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झाला हे खालील प्रमाणे पहा.

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com