लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असून ही 3000 रुपये आले नाही काय करावे..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात गेल्या दोन महिन्यापासून सर्वाधिक लोकप्रिय झाली असून, राज्यभरात महिलांना अर्ज करण्यासाठी लांब लांब रांगा पहायला मिळाल्या होत्या. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत दोन हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा ही झाले आहेत. पुढील हप्ता येत्या आठ दिवसात वितरित करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अधिकृत शासन निर्णय जिआर काढून अनेक सुटी सवलती जाहीर केल्या याशिवाय सदर योजनेत तीन ते चार वेळेस मोठा बदल करण्यात आला. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यातील 01 कोटी 60 लाख महिलांचे अर्ज मंजूर झाले असून, त्यांना दोन महिण्याचे मिळून 3000 हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असून ही राज्यातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही तरी याचे काय करणे आहेत. आणि अशा महिलांनी काय केले पाहिजे याची माहिती खालील प्रमाणे पाहूया.
🔵लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर आहे. तरी पण 3000 रूपये का? आले नाही.
🔸मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर आहे तरीसुद्धा पैसे न मिळण्याचे पहिले कारण आहे की तुमच्या बॅंकेला आधार लिंक नसेल.
🔸तसेच आधार लिंक आहे परंतु आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव नसल्याने सुद्धा अर्ज मंजूर असून लाडकी बहिण योजनेचे पैसे येणार नाही.
🔸 बॅक खात्याच्या संबंधित इतर कारणास्तव बॅक खाते होल्ड होणे किंवा ईकेवायसी करावी लागत असेल किंवा कर्ज खाते असल्यास रक्कम कर्जातून कपात केली असण्याची शक्यता असेल.
🔸अनेक महिलांना आधार लिंक बॅक खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले आहेत आणि महिला अर्ज करतेवेळी दिलेल्या बॅक खात्यात पैसे जमा झाले का चेक करत आहेत तरी तुमच्या बॅक खात्याशी कोणती बॅक लिंक आहे चेक करा.
🔸जर तुमचा अर्ज उशीरा मंजूर झाला असेल तर तुम्हाला सप्टेंबर मध्ये एकदाच 4500 हजार रुपये मिळतील.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी हे काम करा.
1) बॅकेचे इतर काही अडचणी असल्यास दुरुस्ती करावी.
2) आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव आहे का चेक करा.
3) आधार सिडिंग स्टेट्स कोणत्या बॅकेचे लिंक आहे चेक करा.