Hosalikar particha paus – परतीचा पाऊस कसा राहील डॉ होसाळीकर हवामान प्रमुख

Hosalikar particha paus – परतीचा पाऊस कसा राहील डॉ होसाळीकर हवामान प्रमुख

 

Hosalikar particha paus – महाराष्ट्रातील पुणे वेद शाळेचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सप्टेंबर मध्ये राज्यात पाऊस कसा राहील याचा अंदाज आणि परतीचा पाऊस कसा राहिल. याबदल स्पष्ट अंदाज व्यक्त केला आहे. लवकरच खरिपातील सोयाबीन, उडिद यासारखे पिकाची काढणीला येत असून, पिक काढणी वेळी हवामान कसे असेल याबाबत शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक असते. तरी होसाळीकर यांनी काय अंदाज व्यक्त केला ते खालील प्रमाणे पाहूया.

हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात परतीचा पाऊस सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतो. परंतु अजून भारतीय हवामान विभागाने राजस्थान मधुन परतीचा पाऊस कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. भारतीय हवामान खात्याने राजस्थान मधुन मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होईल हे आधी कळवले जाईल आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्राबाबत अंदाज लावता येईल. असं कृष्णानंद होसाळीकर म्हणाले.

कृष्णानंद होसाळीकर म्हणतात कि सप्टेंबर महिन्यात वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी दुपारपर्यंत शेतात काम करुन दुपारनंतर शेतातील ईतर कामे जि घरबसल्या करता आली तर करावी म्हणजे वारे आणि विजेपासून सुरक्षा करता येईल. याशिवाय पाऊस सुरू होताच पाळीव प्राणी आणि स्वतः सुरक्षित ठिकाणी रहावे असे ही होसाळीकर यांनी सांगितले आहे.

Hosalikar particha paus – राज्यातील अनेक हवामान तज्ञानी महाराष्ट्रात परतीचा पाऊस हा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होईल कसा अंदाज व्यक्त केला आहे. आणि ला-निनाच्या प्रभावामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

देशभरात मान्सूनचे आगमन जुन मध्ये तर परतीचा प्रवास राजस्थान मधुन सप्टेंबर मध्ये सुरू होतो. यंदा भारतीय हवामान विभागाने परतीच्या पावसाबद्दल कोणतीही घोषणा केली नाही. जेव्हा परतीचा प्रवास राजस्थान मधुन सुरू होईल त्यानंतर महाराष्ट्रातून कधी निघून जाणार याचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात येईल असे कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे. Hosalikar particha paus

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com