Nuksaan bharpaai 2024 :- मराठवाड्यातील ऑगस्ट आणि सप्टेंबर नुकसान भरपाई या तीन जिल्ह्यांना मिळणार.
Nuksaan bharpaai 2024 :- यंदा म्हणजे 2024 मध्ये मराठवाड्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले, या नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईसाठी शासनाने अधिकृत शासन निर्णय घेऊन मदत वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये नुकसान झालेले जिल्हे बीड, लातूर, परभणी या तीन जिल्ह्यांच्या वाटेवर 987 कोटी 58 लाख 33 हजारांची मदत वितरित होणार आहे.
मराठवाड्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी, तसेच पुर, यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव सरकारकडे प्राप्त झाले होते. Nuksaan bharpaai 2024
2024 ऑगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पुर यामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 997/कोटी 04/लाख 36 हजार रुपये निधी वितरणास सरकारने मान्यता दिली होती.
🔵जिल्हानिहाय मदत कशी असणार.?
ऑगस्टमध्ये मराठवाड्यामध्ये बीड, लातूर आणि परभणी या 03 जिल्ह्यांत नुकसान झालेल्या 04 लाख 42/हजार 447 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नुकसानग्रस्त 06/लाख 09 हजार 569 शेतकऱ्यांना 603 कोटी 43 लाख 95 हजार रुपये वितरित करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. Nuksaan bharpaai 2024