Nuksaan bharpaai mh – या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदान मिळणार.
राज्यात 2022 मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाने विभागीय आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार 1500/कोटी जिल्हानिहाय वाटपास मंजुरी दिली होती. ज्या जिल्ह्यांना अधिक निधीची आवश्यकता होती. अशा जिल्ह्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडून लाभार्थ्यांची (डीबीटी) प्रणाली द्वारे माहिती 28/02/2024 रोजी भरून घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
सदर योजनेचा अधिकृत शासन निर्णय येथे क्लिक करून पहा.
त्यानुसार जिल्हाधिकारी अमरावती, परभणी, वाशीम आणि अहमदनगर या जिल्ह्यात अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती. तरी दिनांक 10/सप्टेंबर रोजी निधी वितरणाचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. Nuksaan bharpaai mh
अधिकृत शासन निर्णयानुसार – वाशीम, अमरावती, परभणी, आणि अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2022 चे सततच्या पावसाचे अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना आता 61/कोटी 16 लाख रुपयांचा निधी वितरणासाठी मंजुरी देण्यात आली आहे. 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदान मिळाले नव्हते, अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
दररोजच्या शेतीविषयक माहिती, बाजारभाव, हवामान अंदाज, शासन निर्णय, मंत्रीमंडळ बैठकीचे निर्णय, शासकीय योजना व इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मध्ये सामील व्हा तसेच हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा. Nuksaan bharpaai mh