Nuksaan bharpaai MH – या 12 जिल्ह्यासाठी 237 कोटी रुपये मंजूर.

Nuksaan bharpaai MH – या 12 जिल्ह्यासाठी 237 कोटी रुपये मंजूर.

 

Nuksaan bharpaai MH ; राज्यात अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदानाच्या (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येत असते.

 

Nuksaan bharpaai MH – दिनांक. 27/मार्च/2023 च्या अधिकृत शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष आणि दर निश्चित करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने विहित केलेल्या 12/नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य सरकारने दि.30/जानेवारी/2014 अन्वये अवेळी पाऊस, कोसळणे, समुद्राचे उधाण आणि आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्याना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहेत.

 

या शिवाय दि.22/जून/2023 च्या अधिकृत शासन निर्णयान्वये सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. दि. 01/जानेवारी/2024 च्या अधिकृत शासन निर्णयानुसार नोव्हेंबर/2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस आणि गारपीट, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानी करिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत करण्यात आली आहे.

 

सदर योजनेचा अधिकृत शासन निर्णय GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

राज्यात जून/2024 ते ऑगस्ट/2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव सरकारने पाठवले होते, त्यानुसार अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तसेच त्याच कालावधी करिता प्राप्त झालेल्या उर्वरित जिल्ह्यांकरिता 237/कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

जून/2024 ते ऑगस्ट/2024 या कालावधीत राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 237/कोटी एवढा निधी वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. Nuksaan bharpaai MH

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com