October Rain Alert – देशात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज डॉ. मृत्युंजय महापात्रा.
October Rain Alert – ईशान्य मोसमी वारे ईशान्य मॉन्सून तसेच मॉन्सूनोत्तर हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात दक्षिण भारतात 112/टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, या कालावधीत महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
यंदाच्या हंगामामध्ये ऑक्टोबर मध्ये देशात चांगल्या पावसाचे संकेत आहेत असं हवामान बिभागाने म्हंटल. या काळात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 115/टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता. सरासरीनुसार ऑक्टोबर मध्ये देशात 75.4 मिलिमीटर पाऊस पडतो. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा शक्यता आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र तसेच कोकणात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून स्पष्ट होत आहे.
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी काल दि. 01/ऑक्टोबर रोजी नवीन अंदाज वर्तवला आहे. तसेच दक्षिण भारतातील ईशान्य मोसमी वाऱ्यांचा ईशान्य मॉन्सून – हंगाम, मॉन्सूनोत्तर हंगाम आणि ऑक्टोबर महिन्याचा अंदाज त्यांनी जाहीर केला. वायव्य भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, उर्वरित देशात मॉन्सून सक्रिय झाला असल्याचा अंदाज महापात्रा यांनी दिला.
मॉन्सूनचे वारे देशातून गेल्यानंतर दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, सीमावर्ती भाग, रायलसीमा, केरळ, तमिळनाडू, दक्षिणअंतर्गत कर्नाटक या भागात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होते. हे वारे बंगालच्या उपसागरावरून बाष्प घेऊन येत असल्याने दक्षिण भारतात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असते. October Rain Alert