Panjabrao dakh particha paus – राज्यात परतीचा पाऊस कधी सक्रिय होणार पंजाबराव डख म्हणतात..
Panjabrao dakh particha paus – राज्यातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी परतीच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच या अंदाजामध्ये त्यांनी पुढील आठवड्याभरात हवामान असे राहील याचा ही अंदाज दिला आहे. पंजाबराव डख यांनी परतीचा पाऊस कधी सक्रिय होणार याबाबत सविस्तर माहिती या लेखात खालील प्रमाणे पाहूया….
🔸पंजाबराव डख यांच्या मते, आज या भागात पावसाचा अंदाज.
आज दिनांक. 07/सप्टेंबर रोजी दुपारनंतर जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नगर, नाशिक, वाशीम या जिल्ह्यात भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज डख यांनी दिला.
🔸हवामान अभ्यासक पंजाबराव डख – या भागात पावसाची उघडीप राहिल. Panjabrao dakh particha paus
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार लातूर, धाराशिव, या भागात पावसाचा जोर कमी होणार असून, या भागात अगदी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल तरी शेतकऱ्यांनी उडीद तसेच काढणीला आलेले सोयाबीन काढण्यासाठी चांगले वातावरण पाहून काढणी करून घ्यावी. शेतकरी मित्रांनो पिकाची काढणी दुपारपर्यंत करून दुपारनंतर काढलेले पिक व्यवस्थित झाकून ठेवावे असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
🔸राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास कधी पासून सक्रिय होणार. पंजाब डख
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, राजस्थान मधुन परतीचा पावसाचा प्रवास 20/सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता असून परतीचा प्रवास 20/सप्टेंबर ला सुरू होणार, असला तरी महाराष्ट्रातून मान्सून जायला उशीर होणार असल्याचे डख यांनी सांगितले Panjabrao dakh particha
paus