Ramchandra sabale havaman andaz – राज्यात परतीचा पाऊस कधी सुरु होणार रामचंद्र साबळे.
Ramchandra sabale havaman andaz – राज्यातील जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी परतीचा पाऊस कधी सुरु होणार याबाबत नवीन हवामान अंदाज वर्तवला असून, राज्यात पुढे हवामान कसे राहील याबाबत ही अंदाज व्यक्त केला आहे. खालील प्रमाणे पाहूया परतीचा मान्सून कधी सक्रिय होणार – रामचंद्र साबळे.
ज्येष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार परतीचा पाऊस सुरु होण्यास अजून काहीसा वेळ आहे. सध्या राजस्थानमध्ये अजून अधून मधून पाऊस सुरु आहे. ज्यावेळी राजस्थानमध्ये हवेचा दाब वाढेल तेव्हा तिथे पाऊस थांबेल वारे आग्नेयकडून ईशान्यकडे तेथून दक्षिण दिशेने वातील तेव्हाच परतीचा माणूस सुरू होईल. Ramchandra sabale havaman andaz
पश्चिम विदर्भच्या भागात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून, राज्यात सुरू असलेला पाऊस आजपासून कमी होण्याचे अंदाज आहे. विदर्भातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते जोरदार पावसाचा इशारा रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. तरी उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम पाऊस पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रातील (आसन)चक्रीवादळ निर्मूलनानंतर वायव्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून, पश्चिम विदर्भाच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
राज्यामध्ये पावसाची हजेरी आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली असून. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 33.9 अंश तापमानाची नोंद झाली असून, राज्यामध्ये कमाल तापमानाचा पारा 30/अंशांच्या खाली घसरला असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. आज राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता असून. विदर्भात विजांसह मध्यम ते जोरदार
सरींचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. Ramchandra sabale havaman andaz