Ration Big News ; या लाभार्थ्यांचे रेशन 31/ऑक्टोबर पासून होणार बंद.
Ration Big News ; शासनाने राशन कार्ड चे बोगस लाभार्थी वगळण्यासाठी राशन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले, या पूर्वी केंद्र सरकारने 30/जुन हि राशन आधार लिंक करण्यासाठी शेवटची तारीख दिली असून, आता यामध्ये वाढ करुन 31/ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत अधिकृत माहिती दिली.
केंद्र सरकार वन नेशन वन रेशन या योजनेअंतर्गत आधारला राशन लिंक करणं बंधनकारक करत आहे. त्यामुळे मृत लाभार्थ्यांच्या नावावरील राशन बंद होईल, आणि गरजू लोकांना राशन धान्य पोचवणे शक्य होईल. आणि मयत व्यक्तीचे नाव राशन कार्ड मधुन काढण्यासाठी शिधावाटप कार्यालयात संपर्क करावा. (Ration Big News)
अनेक लाभार्थींकडे एकापेक्षा जास्त राशन कार्ड असून, वेगवेगळ्या ठिकाणाहून ते राशनचा लाभ घेत आहेत. तसेच घरातील मृत सदस्याच्या नावानेपण राशन घेतले जाते. या सर्व गोष्टीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक सदस्यांना आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करण्यासाठी सक्ती केली आहे. जे राशन कार्ड धारक आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करणार नाही त्या लाभार्थ्यांचे राशन 31/ऑक्टोंबर पासून बंद होणार आहेत.
🔵राशन कार्ड ईकेवायसी कुठे आणि कशी करावी. Ration Big News
राशनकार्ड ई-केवायसी करण्यासाठी आपल्या राशन दुकान दाराकडे जाऊन करु शकता. तसेच हि प्रक्रिया ऑनलाईन सुद्धा केली जाते. तुम्ही अद्याप आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक केले नसेल तर 31/ऑक्टोंबर आधी ही प्रक्रिया पुर्ण करा म्हणजे तुमचे राशन बंद होणार नाही.
🔸अधिक माहिती खालील YouTube video सविस्तर पहा.