Solar pamp yojana :- मागेल त्याला सोलार पंप, शेवटची संधी हे काम करा.
Solar pamp yojana :- शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा पिकाला पाणी देण्याची सोय व्हावी याकरता राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 90 टक्के ते 95 टक्के अनुदानावर सोलार पंप दिले जातात.
पिएम कुसुम योजना, मागेल त्याला सोलार पंप तसेच महावितरण च्या माध्यमातून सोलार पंप योजना राबविल्या जात आहेत. राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत महावितरणच्या माध्यमातून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सोलार पंप हस्तांतरित करण्यात येणार आहे.
सोलार पंपासाठी पात्र आणि अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे आणि पेमेंट हि प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. महावितरणकडून पात्र शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे मेसेज दिले आहेत.
24/ऑक्टोंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालावधी दिला असून. जर तुम्ही सोलार पंपासाठी अर्ज केला असेल आणि तुम्हांला सेल्फ सर्वे आणि पेमेंट साठी मेसेज आला असेल, तर 24/ऑक्टोंबर पर्यंत सेल्फ सर्वे आणि पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज बाजूला काढून नवीन शेतकऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.