Soyabin kapus anudan 2023 – कापूस आणि सोयाबीनचे अनुदान या तारखेपासून बँक खात्यात जमा होणार
Soyabin kapus anudan – 2023 मध्ये सोयाबीन आणि कापसाचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमी वरती राज्य सरकारने भावांतर योजनेची घोषणा केली. सदर योजनेअंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 05 हजार रुपये 02 हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून 04 हजार 194.68 कोटी मंजूर करण्यात आले आहे.
राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी वित्त मंत्रालय व महसूल विभागाच्या मदतीने तातडीने सोडवाव्यात आणि 10/सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना लवकर हे अनुदान वाटप करण्याच्या सूचना कृषीमंत्री धनंजय मुडे यांनी दिल्या आहेत. Soyabin kapus anudan 2023
🔸कापूस आणि सोयाबीन साठी खालील प्रमाणे निधी मंजूर केला आहे.
या अनुदानामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 01/हजार/548.34 कोटी रुपये, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 02/हजार/646.34 कोटी रुपये असे एकूण 04/हजार 194.68 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्य सरकारने 30/ऑगस्ट 2024 रोजी, खरीप हंगाम 2023 साठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर आर्थिक सहाय्य देण्याची प्रक्रिया जाहीर केली. संबंधित शासन निर्णय निर्गमित करून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. तरी हे अनुदान 10/सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होण्यास सुरवात होईल.
टीप – शेतकरी मित्रांनो, कुठल्याही योजनेचा लाभ हा थेट (DBT) द्वारे बँक खात्यात दिला जातो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्याला आधार लिंक नाही त्यांनी तातडीने आपल्या बँक खात्याला आधार लिंक करावे. Soyabin kapus anudan 2023