wells subsidy 4 lakh anudan – विहिरीला मिळणार 4 लाख अनुदान मागेल त्याला विहीर ही अट रद्द.
wells subsidy 4 lakh anudan – राज्य सरकारच्या माध्यमातून विहीर साठी 4 लाख रुपये अनुदान ; सरकारच्या माध्यमातून सिंचनाकरिता मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येत आहे. त्यामधील एक अनुदान म्हणजे विहीर साठी अनुदान, या अनुदानामध्ये नवीन विहीर खांदायची असेल तर 4 लाख रुपये देण्यात येईल व जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी 1 लाख रुपये देण्यात येणार आहे. तसेच दोन सिंचन विहिरीमध्ये अंतराची अट रद्द करण्यात आलेली आहे.
शेततळे, वीज, विहिरी जोडण्यासाठी भरीव अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून शेततळे, वीज, विहिरी जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे(मंत्रिमंडळाच्या बैठकीत). मंत्रीमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
मंत्रिमंडळात झालेल्या सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहीरी करिता 4 लाखापर्यंत तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीकरिता 1 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. पूर्वी ह्या अनुदानाचे अनुक्रमे अडीच लाख आणि 50 हजार एवढे होते. इनवेल बोअरिंग साठी आता 40 हजार रुपये तसेच यंत्रसामग्रीसाठी 50 हजार रुपये आणि परसबागेकरिता 5 हजार रुपये देण्यात येईल. तसेच नवीन विहिरीबाबत 12 मीटर खोलींची अट रद्द करण्यात आली आहे. wells subsidy 4 lakh anudan
तसेच दोन सिंचन विहिरीमध्ये 500 फूट अंतराची अट देखील रद्द करण्यात आली आहे. तसेच शेततळ्यांच्या प्लास्टिक अस्तरीकरण्यासाठी देखील एक लाख रुपये अनुदान देण्यात येते आता ते स्वतःच्या खर्चाच्या 90% किंवा 2 लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल. त्याप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या 25 हजार रुपये देण्यात येत आहे. आता तुषार सिंचन संच 47 हजार रुपये किंवा स्वताच्या खर्चाच्या 90% अनुदाना पैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल.wells subsidy 4 lakh anudan