लाडकी बहीण योजना नवीन नियम लागू या महिलांना पुढील हप्ते मिळणार नाही.
राज्यात सध्या एकच चर्चा सुरु आहे टी म्हणजे, लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आतापर्यंत 02 कोटीपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहे. आणि 01 कोटी 65 लाखांपेक्षा जास्त महिलांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे मिळून 3000 रु महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. तसेच 30/सप्टेंबरपर्यंत उर्वरित महिलांना अंगणवाडी सेविका कडे नवीन अर्ज करता येणार आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांनी बनावट कागदपत्रे जोडून अर्ज सादर केले होते. आणि पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचा लाभ घेतला होता. मात्र आता गैर व्यवहार आणि डुप्लिकेट कागदपत्रे अपलोड अर्जाची परत एकदा छाननी करून बनावट कागदपत्रे जोडलेल्या महिलांचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेतून कोणत्या महिला अपात्र होणार आणि यामध्ये कोणता नवीन नियम लागू होणार याबाबत खालील प्रमाणे माहिती पाहूया.
🔵लाडकी बहिण योजनेमध्ये खालील प्रमाणे अर्ज केलेल्या महिलांचे पुढील हप्ते कायमचे बंद होणार
🔸 लाडकी बहिण योजनेमध्ये अधिक महिलांनी बनावट – डुप्लिकेट कागदपत्रे तयार करून अर्ज भरले आहेत. तरी डुप्लिकेट कागदपत्रे अपलोड करून केलेले अर्ज कायमचे रद्द होणार आहेत.
🔸 एकाच महिलांचा दोन वेळा फार्म भरलेल्या असेल तर हे अर्ज सुद्धा रद्द केले जाणार आहेत. कागदपत्रांत थोडासा बदल करून अनेक महिलांनी दोन वेळा अर्ज भरले आहेत.
🔸अनेक महिलांना पिएम किसान, नमो शेतकरी यासारख्या योजनांचा लाभ मिळत असून. पिएम किसान, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी लाडकी बहिण योजनेमध्ये पात्र होतील असे सांगितले होते. परंतु ज्या महिला निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत त्या महिलांना लाडकी बहिण योजनेतुन बाद केले जाणार आहे.
🔸 ज्या महिलांनी अर्ज करताना बॅंकेचे ज्वाईंड खाते क्रमांक दिला असेल, अशा महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडा त्यानंतर सदर योजनेचा लाभ मिळेल.
वरील प्रमाणे सरकारने लागू केलेल्या नियमावली विरुद्ध जर महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असेल, तर त्या महिलांना अर्जाची छाननी पुर्ण झाल्यावर येणारे हप्ते कायमचे बंद होणार आहेत. अधिक माहिती खालील YouTube video सविस्तर पहा.